मोदींनी झटकले हात

March 22, 2010 3:00 PM0 commentsViews: 1

22 मार्चगुजरात दंगलप्रकरणी स्पेशल एन्व्हेस्टिगेशन टीमच्या समन्सवर मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. काल 2002च्या गुजरात दंगलप्रकरणी मोदींना स्पेशल एन्व्हेस्टिगेशन टीमसमोर हजर व्हायचे होते. पण असे कोणतेही समन्स आपल्याला बजावण्यात आलेले नाही, असे सांगत नरेंद्र मोदींनी या प्रकरणी हात झटकले आहेत. यासंदर्भात देशाला उद्देशून मोदींनी एक जाहीर पत्रच लिहिले आहे. त्यात मोदी म्हणतात…चौकशीसाठी टीमसमोर हजर होण्याची 21 मार्च ही तारीख नक्की झाली नव्हतीस्पेशन एन्व्हेस्टिगेशन टीमच्या आदेशाला कायद्यानुसार उत्तर देईनयाआधीही, माझी प्रतिमा डागाळण्याचे अनेक प्रयत्न केले गेलेगेल्या 8 वर्षांत माझ्याविरोधात अनेक मोहिमा राबवल्या गेल्यागुजरात राज्याची आणि पर्यायाने माझी प्रतिमा मलीन करण्याचा हा कट आहेअशा प्रकारच्या घटनांमुळे गुजरातच्या अस्मितेला धोका पोहोचतोपण जाहीरपणे एवढी माहिती देणारे मोदी चौकशीसाठी स्पेशल एन्व्हेस्टिगेशन टीमसमोर कधी हजेरी लावणार, याची त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. 2002 मध्ये दंगलीत काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासह 69 जणांचा बळी गेला होता. याप्रकरणी एसआयटीने मोदींना समन्स बजावलेले आहे. दरम्यान पक्षानेही याप्रकरणी नरेंद्र मोदींचीच बाजू घेतली आहे.

close