भगव्या राष्ट्रध्वजासाठी बाबासाहेब आंबेडकर अनुकूल होते – अमर साबळे

April 14, 2016 7:17 PM0 commentsViews:

14 एप्रिल :  राष्ट्रध्वजासंबंधीच्या वादाला भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी पुन्हा एकदा तोंड फोडलं आहे. भगव्या राष्ट्रध्वजासाठी बाबासाहेब आंबेडकर होते अनुकूल, असा वादग्रस्त वक्तव्य भाजपचे खासदार अमर साबळे यांनी केलं आहे.

Amar Sable

आपल्या देशाचा राष्ट्रध्वज भगवा असावा या मागणीसाठी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ही अनुकूल होते, असा दावा खासदार अमर साबळेंनी केला आहे.बाबासाहेबांची इच्छा असूनही मागणी करणारं शिष्टमंडळ पाठपुरावा करण्यात कमी पडल्याने आपल्या देशाचा राष्ट्रध्वज भगवा होऊ शकला नाही , असही म्हटलं आहे.

दरम्यान, साबळेंच्या या वादग्रस्त विधानाचा प्रकाश आंबेडकर यांनी खरपूस समाचार घेतला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा