ट्रान्सहार्बरवरून पुन्हा जुंपणार

March 22, 2010 3:17 PM0 commentsViews: 4

22 मार्चमहत्वाकांक्षी शिवडी – न्हावा शेवा ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाच्या बांधकामावरून काँग्रेस राष्ट्रवादीत आता पुन्हा जुंपणार आहे. एमएसआरडीसीकडून हे काम एमएमआरडीएकडे वर्ग करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. पण हे काम एमएसआरडीसीकडेच आहे. ते एमएमआरडीएकडे देण्याचा प्रश्नच नाही, असा दावा जयदत्त क्षीरसागर यांनी केला आहे. एमएसआरडीसीकडून हे काम काढून घेताना मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला विश्वासात न घेता केंद्र सरकारकडून या प्रकल्पाच्या खर्चातील 30 टक्क्यांची तफावत भरुन काढण्यासाठी अर्थसहाय्य मिळवले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा उपद्‌व्याप राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

close