गुडीपाडवा मेळाव्यात आवाजाची मर्यादा ओलांडल्याने मनसेला हायकोर्टाची नोटीस

April 15, 2016 1:47 PM0 commentsViews:

Raj Thackeray

मुंबई – 15 एप्रिल : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या शुक्रवारी शिवाजी पार्कमध्ये घेतलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात आवाजाची मर्यादा ओलांडल्यामुळे मुंबई हायकोर्टाने पक्षाला नोटीस बजावली आहे. कोर्टाने दिलेल्या सूचनांचा अवमान केल्यावरून पक्षाला नोटीस बजावण्यात आली असून, याप्रकरणाची पुढची सुनावणी21 जुनला होणार आहे.

गेल्या शुक्रवारी मनसेतर्फे शिवाजी पार्कमध्ये गुढीपाडवा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला परवानगी देताना हायकोर्टाने सभास्थानी आवाज 50 डेसिबलच्या पातळीपलीकडे जाणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले होते. मनसेने हे निर्देश पाळण्यास सहमती दर्शविली होती. मात्र त्या अटींचा भंग झाल्यामुळे कोर्टाने मनसेला नोटीस पाठवली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा