पाकिस्तानमधल्या गायक रिक्षाचालकाचं लतादीदींनी फेसबुकवर केलं कौतुक

April 15, 2016 3:46 PM0 commentsViews:

मुंबई – 15 एप्रिल :  असं म्हणतात अंगात कला असली तर ती फार काळ लपून राहत नाही, पाकिस्तानच्या कराचीमधल्या एका रिक्षाचालकाबाबतही हे खरं ठरलंय. मास्टर अस्लम या रिक्षाचालकाच्या गाण्याचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. तो चक्क गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी एकला आणि शेअरही केला. मास्टर अस्लम यांनी रिक्षा चालवू नये तर त्यांनी माईकसमोर उभं रहावं, अशा शब्दांत लतादीदींनी फेसबुकवर त्यांचंं कौतुक केलं.

LATA MANGESHKAR on Rickshawwala

लता दीदींचे हे शब्द जेव्हा मास्टर अस्लमना कळले, तेव्हा ते भारावून गेले. लतादीदी या गायनामधल्या देवी आहेत, त्यांनी माझं कौतुक करणं म्हणजे माझ्याकडे शब्दच नाहीत, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मास्टर अस्लम यांना एका चित्रपटात गायची संधी मिळाही होतीही पण आर्थिकरित्या ते पुरेसं नाही असं त्यांना वाटलं आणि ते कराचीत परतले. त्यानंतर ते अडीच वर्षं आजारी होते. त्यात त्यांची आयुष्यभराची पुंजी खर्च झाली. त्यानंतर पोटापाण्यासाठी त्यांनी रिक्षा चालवायला सुरुवात केली. त्यांच्या गाण्यावर बडे गुलाम अली खान सहाब यांच्या प्रभाव आहे, असं अस्लम म्हणतात.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा