माणिकचंदचे प्रायोजकत्व मागे

March 22, 2010 5:50 PM0 commentsViews: 2

22 मार्चगेले काही दिवस साहित्य संमेलनावरून सुरू असलेला वाद मिटला आहे. माणिकचंद उद्योग समुहाने साहित्य संमेलनाचे प्रायोजकत्व मागे घेतले आहे. व्यसनाचे पैसे साहित्य संमेलनाला वापरू नयेत, अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी मांडली होती. त्यावरून बरीच मतमतांतरे झाली. संमेलनाध्यक्ष द. भि. कुलकर्णी यांनीही संमेलनासाठी पैशाची उधळपट्टी नको, असे मत मांडले. तर स्वागताध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी मात्र कितीही पैसा खर्च झाला तरी संमेलन देखणेच करू, अशी भूमिका घेतली होती. पुणेकरांनीही याप्रकरणी नाराजी व्यक्त केली होती. अखेर, माणिकचंदनेच संमेलनाचे प्रायोजकत्व मागे घेतल्याची माहिती पुण्यात पत्रकार परिषदेत स्वागताध्यक्षांनी जाहीर केली.

close