मराठवड्यातल्या दुष्काळग्रस्तांचं मुंबई-ठाण्यात स्थलांतर

April 15, 2016 10:34 PM0 commentsViews:

15 एप्रिल :  मराठवाड्यातले दुष्काळग्रस्त आता पाणी, अन्न आणि कामाचा शोध घेत मुंबईपर्यंत पोहोचलेत. नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातली अनेक कुटुंबं घाटकोपर परिसरात आली होती. पण उघड्यावर राहणार्‍या या कुटुंबांसाठी एकानाथ शिंदेंनी ठाण्यात एक छावणी उभारली आहे. या छावणीत सध्या 60 कुटुंबं राहत आहेत. या ठिकाणी या सर्व दुष्काळग्रस्तांच्या दोन वेळच्या जेवणाचीही सोय करण्यात आली आहे. पण ठाण्यातच तीन हात नाक्यावर बीड जिल्ह्यातून आलेली कुटुंब अजूनही उघड्यावर आहेत. आपल्या म्हातार्‍या आईवडिलांना गावी सोडून, आपल्या बायकापोरांसह अनेक तरुण मुंबईत मोठ्या आशेने आले आहेत. पण इथे आल्यावरही त्यांच्या समस्या कमी झाल्या नाहीयेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा