तृप्ती देसाई मारहाण प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल

April 16, 2016 12:36 PM0 commentsViews:

trupti-desai_

16 एप्रिल :  भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या मारहाण प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले असून, यातील 5 जण श्री पूजक आहेत. तर दोन जण राष्ट्रवादी काँगेसचे कार्यकर्ते आहेत.

श्री पूजक केदार मुनीश्वर, शिरीष मुनीश्वर, चैतन्य अष्टेकर, निखिल शानभाग व राष्ट्रवादी काँगेसहचे कार्यकर्ते जयकुमार शिंदे आणि किसन कल्याणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.

तृप्ती देसाई या गुरूवारी कोल्हापूरच्या मंदिरात अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. तृप्ती मंदिराजवळ आल्यानंतर त्यांना धक्काबुक्की करून मारण्यात आले. मारहाणीत जखमी झाल्याने त्यांना स्थानिक रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा