मराठवाड्यातील उद्योगांचे पाणी बंद करण्यास पंकजा मुंडेंचा विरोध

April 16, 2016 6:49 PM0 commentsViews:

marathwada Daru company

16 एप्रिल :  दारू कंपन्यांचं पाणी बंद करायचं की नाही, यावर अहवाल आल्यावर निर्णय घेऊ, अशी घोषणा जलसंपगा मंत्री गिरीश महाजन यांनी आजच केली पण याला भाजपमधूनच विरोध होताना दिसतोये. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडेंनी पाणी बंद करायला विरोध केला आहे. पिण्याच्या पाण्याची वाटप बीअर कंपन्यांना केलं जात नाही. त्यामुळे उद्योगांना पाणी पुरवठा बंद करणं हे पूर्णपणे चूकीचं असल्याचं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

बीअर आणि दारू कंपन्यांना उद्योगासाठी आरक्षित केलेलं पाणी दिलं जातं आहे. जे पिण्यासाठी किंवा शेतीसाठी पाणी राखीव असतं, ते पाणी उद्योगांना दिलं जात नाही. जर शेतीचे पाणी उद्योगांना देत असतील तर ताबडतोब बंद करण्यात येईल. मात्र, उद्योगांना पाणी पुरवठा केलं जाईल. त्यावर बंदी घालणे चुकीचं आहे. जर पाणी बंद केलं तर काही महिने कारखाने बंद राहतील, आणि त्यामुळे रोजगारावर परिणाम होईल, असं मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केलं आहे.

पंकजांच्या या वक्तव्यावरून सरकारमध्येच मतभेद आहे असं दिसतंय. याचं कारण म्हणजे, औरंगाबाद एमआयडिसीतील मद्य निर्मिती कंपन्याचं पाणी तोडण्यासंदर्भात चौकशी करून निर्णय लवकरच निर्णय घेऊ, असं आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं आहे.

मराठवाड्यात तीव्र पाणी टंचाई असतानाही औरंगाबाद एमआयडिसीत मद्य निर्मितीसाठी लाखो लीटर पाणी वापरलं जातं आहे याविरोधात विरोधकांनी जोरदार आवाज उठवला होता. त्यानंतर गिरीश महाजनांनी पाणी कपातीसंबंधीचे संकेत दिलेत. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात अवघा अडीच ते तीन टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे दुष्काळी मराठवाड्यातील बिअर कारखाने बंद करण्याची मागणी माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. याबाबत मंगळवारपर्यंत निर्णय घेऊ, असे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

दुष्काळी पार्श्वभूमीवर बिअर कारखाने बंद करण्याबाबत औरंगाबादचे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचे महाजन यांनी सांगितलं. बिअर कारखाने बंद करुन जर फायदा होणार असेल तर तसा निर्णय सरकार घेईल, असंही त्यांनी म्हटलं. पण आता पंकजांच्या या विधानानंतर पाण्याबाबत काय होणार, असा प्रश्न निर्माण होतं आहे.

दरम्यान, मराठवाड्यात दारु कंपन्यांना दिलं जाणारे पाणी तात्काळ बंद करा, असा आक्रमक पवित्रा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. दुष्काळी परिस्थितीत दारुऐवजी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणं आवश्यक आहे. पाणी ही निर्माण करता येणारी गोष्ट नसल्यामुळे शक्य तिथे पाणी वाचवणं गरजेचं आहे. त्यामुळे दारू उत्पादक कंपन्यांचा पाणीपुरवठा तात्काळ बंद करावा, असं उद्धव यांनी सांगितलं. सरकारला दारूतून मिळणार्‍या महसुलाची चिंता पडली असेल तर महसूल इतर गोष्टींतून मिळवता येऊ, शकेल असंही उद्धव यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा