जपानमध्ये भूकंपाचे धक्के, 32 जणांचा मृत्यू

April 16, 2016 1:23 PM0 commentsViews:

16japan-quake4

16 एप्रिल :   गेल्या 24 तासांत जपान भूकंपाच्या दोन धक्क्यांनी हादरून गेलं आहे. यामध्ये 32 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक नागरिक जखमी झाले आहेत. तर भूकंपाच्यावेळी पडलेल्या ढिगार्‍याखाली शेकडो लोक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मदतकार्यासाठी अधिक वेळ लागत असल्याने मृतांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता आहे.

शनिवारी पहाटे 1 वाजून 25 मिनिटांनी 7.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा धक्का जाणवला. त्यामध्ये 32 जणांचा मृत्यू झाला. या भूकंपामुळे क्यूशु बेटांना देखील मोठा धक्का बसला. कुमामोतो हे भूकंपाचा केंद्र बिंदू असून, भूकंपामुळे समुद्रात 1 मीटर 3 फूटापर्यंत पाण्याचा लाटा उसळल्या होत्या. त्यामुळे सरकारने समुद्र किनारी राहणार्‍या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचण्यास सांगितलं आहे.

भूकंपानंतर अनेक घरं उध्वस्थ झाली असून, जमिनीला मोठय़ाप्रमाणात भेगा पडले आहेत. सरकारकडून तत्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र मातीच्या ढिगार्‍याखालून लोकांना बाहेर काढणे अधिक जिकरीचे ठरत असल्याची माहिती एका अधिकार्‍याने दिली.

दरम्यान, गुरुवारी रात्री क्यूशुमध्ये 6.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला होता त्यामध्ये 10 जण ठार, 800 जखमी झाले होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा