अंधेरीत लोकलला अपघात

March 22, 2010 6:01 PM0 commentsViews: 1

22 मार्चअंधेरी स्टेशन येथील हार्बर लाईनवरच्या लोकलला अपघात झाला. यात पाच-सहाजण किरकोळ जखमी झाले. अंधेरी स्टेशनवरच्या हार्बर लाईनच्या प्लॅटफॉर्म नंबर 7 आणि 8 इथे ही ट्रेन येत होती. गाडी प्लॅटफॉर्मवर येत असताना, लोकल अचानक प्लॅटफॉर्मच्या भिंतीला धडकली. यानंतर काही काळ प्लॅटफॉर्मवरची वाहतूक थांबवण्यात आली. आणि अंधेरीकडे जाणार्‍या हार्बर लाईनवरच्या गाड्या वांद्रे इथूनच परत पाठवण्यात आल्या.

close