मुंबईत लोडशेडिंगची भीती

March 22, 2010 6:07 PM0 commentsViews:

22 मार्चयेत्या 31 मार्चला टाटा आणि रिलायन्समधला वीज खरेदीचा करार संपुष्टात येत आहे. त्यामुळे 500 मेगावॅट वीजेची तूट निर्माण होईल. त्यातून मुंबईत लोडशेडिंग करावे लागण्याची भीती राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी विधानसभेत व्यक्त केली. पुरवणी मागणीच्यावेळी मुंबईत एकच वीजदर लागू करण्याची मागणी मलिक यांनी केली. आणि त्याच वेळी मुंबईत लोडशेडिंग लागू होण्याची भीतीसुद्धा बोलून दाखवली. यावर ऊर्जामंत्री अजित पवार 27 मार्चला बैठक घेऊन योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

close