163 वर्षांपूर्वी आज धावली होती आशियातली पहिली रेल्वे

April 16, 2016 5:49 PM0 commentsViews:

16 एप्रिल : मुंबई सीएसटी ते ठाणे या मार्गावर पहिल्यांदा ट्रेन धावली या घटनेला आज 163 वर्ष पूर्ण झाली. 16 एप्रिल 1853 रोजी ही ट्रेन धावली होती. आशिया खंडातली ही पहिली रेल्वे होती.

Pulled first train to wyche web

पहिली ट्रेन धावलीच ती मुळात 14 डब्यांची.. आणि तिला लोकोमोटिव किंवा वाफेवर चालणारे तीन इंजिन लावले गेले होते… ज्यांची नाव होती सिंध, सुलतान आणि साहिब. पहिली गाडी धावली ती बोरीबंदर आणि ठाणे या स्टेानदरम्यान. आताचं ठाणे हे तेव्हाचं ताना होतं ज्याची इंग्रजीजलं स्पेलिंगही T A N N A H असं होतं.

विशेष म्हणजे रेल्वे धावायला लागली, तेव्हा लोकांना विश्वास बसेना की हे तंत्रज्ञान आहे, आणि रुळांवर ट्रेन धावू शकते. मुंबईत तेव्हा अशी अफवा पसरली होती की ट्रेन म्हणजे एक राक्षस आहे, जो रेळाच्या बाजूला उभ्या असलेल्या लोकांना गिळंकृत करतो. नंतर जेव्हा ट्रेन रोज दिसायला लागली, तेव्हा ही अंधश्रद्धा दूर झाली.

बोरीबंदर भायखळा,सायन, भांडुप आणि ठाणे असे एकुण पाच स्टेशन होते.. पण पहिली ट्रेन तेव्हा फक्त सायन स्टेशनला थांबली होती तीही फक्त पाणी घेण्यासाठी.. इंग्रजांनी पहिली ट्रेन सुरु करण्याआधी द बॉम्बे टाईम्स या तत्कालीन वृत्तपत्रात या ट्रेनचे तिकीट आणि वेळ यासंबधी 8 एप्रिल 1853 ला जाहीरातही दिली होती. त्यावरुन या ट्रेनमधील फर्स्टक्लासचं कमीतकमी तिकीट हे 6 आणे तर सेकंड क्लासचं 2 आणे तर थर्ड क्लासचं 1 आणे होतं हे स्पष्ट होतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा