इक्वेडोरमध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप ; 233 जण मृत्यूमुखी

April 17, 2016 11:19 AM0 commentsViews:

E-ecuador-quake

17  एप्रिल :  दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोरमध्ये काल (शनिवारी) रात्री 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. या शक्तीशाली भूकंपामुळे आतापर्यंत 77 नागरिक मृत्यूमुखी पडलं आहेत. हा धक्का इतका मोठा होता की इक्वेडोरची राजधानी क्वीटोमधील अनेक इमारतींना भेगा पडल्या आहेत. तसंच भूकंपानंतर त्सुनामीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

 दरम्यान, इक्वाडोरमध्ये त्सुनामीचा अलर्टही देण्यात आला आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार भूकंपाचे केंद्र म्युजझेन शहराच्या 27 किलोमीटर दक्षिण पूर्वेला होते. 1979 नंतर याठिकाणी आलेला हा सर्वात मोठा भूकंप आहे.  पोर्तोविजो, गुआक्विल आणि मांटा शहरांमध्ये भूकंपाचा परिणाम सर्वाधिक आहे. या शहरातील विमानतळेही बंद करण्यात आली आहेत.

इक्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष राफेल कोरिया यांनी नाहगरिकांना या कठीण काळात सरकारला सहकार्य करण्याची विनंती केली आहे. देशातील वीज आणि मोबाईल सेवा विस्कळीत झाली आहे. सुरुवातीला भूकंपाची तीव्रता 7.4 सांगण्यात आली होती. पण नंतर यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने त्याची तीव्रता 7.8 असल्याचे सांगितले. भूकंपाचे केंद्र 19 किलोमीटर खोलवर असल्याचे सांगण्यात आले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा