देशभरात उष्णतेची लाट, उन्हाच्या जीवघेण्या चटक्यांनी नागरिक हैराण

April 17, 2016 5:32 PM0 commentsViews:

17  एप्रिल :  ओडिशा, तेलंगण, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि दिल्लीसह देशातील 7 राज्यांमध्ये पारा 40 अंश से. च्या पलिकडे पोहोचला आहे. याआधी 2015 हे मागील 135 वर्षातले सर्वाधिक उष्ण वर्ष वर्ष ठरले होते. यंदाचा उकाडा आणखी असह्य होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. उष्माघातामुळे देशात आतापर्यंत 130 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

heat_wave_243

उष्माघातामुळे तेलंगणमध्ये सर्वाधिक 35 जणांचा तर ओडिशात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणमध्ये शुक्रवारी पारा 44 अंश से. पर्यंत पोहोचला होता. आज तिथे तापमान 42 अंशांच्या घरात पोहोचले आहे. तर ओडिशाच्या काही भागांमध्ये काल तापमान 46 अंशांपर्यंत पोहोचले होते. दिल्लीतही पारा 40 अंशांच्या पलिकडे पोहोचला आहे. उकाडा वाढत असल्यामुळे अनेक राज्यांमध्ये दुपारी रस्त्यांवर एकदम कमी वर्दळ दिसत आहे.

असह्य उकाडा आणि अपुर्‍या पावसामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील शेकडो गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा