वाळू माफियांचा इंदापूरच्या तहसीलदारांवर हल्ला

April 17, 2016 7:13 PM0 commentsViews:

êÖê˾ÖÛúÖê꯾Ö
17  एप्रिल : राज्यात वाळू माफियांची दिवसेंदिवस वाढत चालली आहे. इंदापूर तालुक्यात बेकायदा वाळू उपसा करणार्‍या वाळू माफियांनी थेट तहसीलदार वर्षा लांडगे यांच्यावर हल्ला केला.

तालुक्यात अनधिकृत वाळू वाहतूक करणार्‍यांवर कारवाई केली जात होती, त्यावेळी हा प्रकार घडला. वर्षा लांडगे-खत्री या हल्ल्यात थोडक्यात बचावल्या. पुणे-सोलापूर रस्त्यावर इंदापूरमध्ये आज (रविवार) पहाटे अनधिकृत वाळू वाहतूकदारांवर कारवाई सुरू होती. यावेळी वाळू वाहतूकदार करणार्‍या एका ट्रक मालकाने त्याची गाडी तहसीलदारांच्या गाडीसमोर लावून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणी ट्रक चालकाला अटक केली असून चौकशी केली सुरू आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा