आर्थिक पाहणी अहवाल सादर

March 23, 2010 8:55 AM0 commentsViews: 9

23 मार्चराज्याचा अर्थसंकल्प 25 तारखेला सादर होणार आहे. पण त्याआधीच आज राज्य सरकारने महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीचा अहवाल विधानसभेत सादर केला. राज्यावर सध्या 1 लाख 85 हजार 801 कोटींचे कर्ज आहे. आणि हे कर्ज राज्याच्या एकूण उत्पन्नाच्या तुलनेत 22.3% आहे. राज्यातील सिंचनाखालच्या क्षेत्रात फक्त 2.1 टक्क्यांनी वाढ होऊन ते 31.11 लाख हेक्टर झाले आहे. तर मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अन्नधान्याचे उत्पादन 8 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. पण उसाचे उत्पादन मात्र 11 टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज या पाहणी अहवालात मांडण्यात आला आहे. सोबतच 2009 अखेरपर्यंत राज्याची स्थापित वीज क्षमता 22 हजार 435 मेगावॅट असून त्यामध्ये केवळ 1.6 टक्केच वाढ अपेक्षित आहे. राज्यात सध्या 4 हजार 941 मेगावॅट वीजेची तूट आहे. राज्याची एकूण महसुली तूट 7, 123 कोटी रुपये असल्याचे या आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे

close