नारायण राणेंचं टीकास्त्र आज कोणावर ?

October 12, 2008 1:47 PM0 commentsViews: 15

12 ऑक्टोबर, मुंबईपरळच्या कामगार क्रीडा मैदानात आज नारायण राणे यांचं भाषण होणार आहे. नितेश राणेंच्या स्वाभिमान या संघटनेतर्फे मुंबईत युवकांसाठी आयोजित मेळाव्यात राणे मार्गदर्शन करणार आहेत.या मेळाव्यात राणेंचं टीकास्त्र कोणावर असेल, यावर सर्वांचं लक्ष लागलंय. गेल्या काही दिवसांपासून मेळाव्याचे गोरेगाव, दादर, लालबाग परिसरात पोस्टर्स लागले आहेत.जोरदार तयारी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वावर कडाडून टीका केली होती. शिवाय काँग्रेसमधील नेत्यांवरही राणेंचं टीकास्त्र सुरू आहे.त्यामुळे आजच्या सभेकडे राजकीय निरिक्षकांचं लक्ष लागलं आहे.

close