रविंद्र जाडेजाच्या लग्नात हवेत गोळीबार

April 17, 2016 8:19 PM0 commentsViews:

¸üÖêÌËÖ¸üÖê23

17 एप्रिल :  टीम इंडियाचा धडाकेबाज ऑलराऊंडर रवींद्र जडेजा आज रिवा सोलंकीसोबत विवाह बंधनात बांधला गेला. गुरजातमधील राजकोट इथल्या सीझंस हॉटेलमध्ये त्यांचा विवाह सोहळा राजपूत पध्दतीने मोठ्या थाटात पार पडला. यावेळी लग्नाच्या वरातीमध्ये जाडेजाच्या काही नातेवाईकांनी हवेत गोळीबार केला. जाडेजापासून काही फूट अंतरावर हा गोळीबार झाला.

सुदैवाने यावेळी कोणतीही दुर्घटना घडली नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरु केला. जाडेजाच्या नातेवाईकांनी गोळीबार केल्याचे व्हिडीओ फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. स्वसंरक्षणा व्यतिरिक्त परवानाधारक बंदूक अशा प्रकारे वापरणे बेकायद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 एसपी अनरप यांनी सांगितले की, फायरिंग कोणी केले आहे याचा तपास करण्यासाठी स्थानिक पोलिसांना ऑर्डर दिली आहे. त्यांनी रिपोर्ट दिल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. तसंच फायरिंग करणार्‍यांची ओळख पटविण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा