राज्यभरात उन्हाचा कहर, विदर्भात पारा 45 अंश सेल्सिअसपर्यंत

April 17, 2016 8:47 PM0 commentsViews:

17 एप्रिल :  राज्यभरात उन्हाचा कहर झाला आहे. विदर्भात पारा 44 अंशाच्या वर गेलाय. नागपूरमध्ये काल 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. पश्चिम महाराष्ट्रही तापला आहे.

Heat wave

विदर्भात उष्णतेची लाट पसरलीय. या उन्हाळ्यात सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद नागपूरमध्ये झालीय. उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झालाय. वर्धा आणि चंद्रपूरमध्येही अशीच परिस्थिती आहे. वर्ध्यात पारा 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. वाढतं तापमान लक्षात घेऊ चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात कोल्ड रूमची व्यवस्था करण्यात आलीय. रसवंती आणि शितपेयाच्या दुकानातही गर्दी होतेय.

पुण्याचंही तापमान 40 अंशांच्यावर गेलंय. उन्हापासून संरक्षणसाठी टोप्या, स्कार्फ्सच्या खरेदीसाठी गर्दी होतेय. अंगाची लाही शांत करण्यासाठी पुणेकर शीतपेयं तसंच ऊसाच्या रस पिणं पसंत करतायत.

आणखी तीन ते चार दिवस पारा असाच वाढत राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय.

सलग दोन वर्षं पडलेल्या दुष्काळामुळे यंदाचा उन्हाळा जास्तच कडक आहे. कडक उन्हाळ्यानंतर आता आता प्रतीक्षा आहे चांगल्या मान्सूनची.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा