कनू सन्याल यांची आत्महत्या

March 23, 2010 9:14 AM0 commentsViews: 2

23 मार्चनक्षलवादी आंदोलनाचे प्रणेते कनू सन्याल यांनी आत्महत्या केली आहे. गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. कॅन्सरच्या त्रासाला कंटाळून पश्चिम बंगालमधील नक्षलबारीमध्ये त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. ते 78 वर्षांचे होते. देशात नक्षलवादी चळवळ पसरवण्यात त्यांचे मोठे योगदान होते. 1967मध्ये जमीनदारांच्या विरोधात झालेल्या आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले होते. जमीनदारांकडील अतिरिक्त शेती शेतमजुरांना मिळावी, यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले होते.गरीब, कष्टकरी, मजुरांची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.

close