नितेश राणेंनी कापला श्रीहरी अणेंचा फोटो असलेला केक!

April 18, 2016 5:15 PM0 commentsViews:

18 एप्रिल :   काही दिवसांपूर्वी श्रीहरी अणे यांनी महाराष्ट्राची प्रतिकृती असलेला केक कापून वेगळ्या विदर्भाला विरोध करणार्‍या नेत्यांना थेट आव्हान दिलं होतं. अणेंच्या या कृतीला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी काल (शनिवारी) अणे यांचा फोटो असलेला केक कापला. आम्ही अणेंचं वेगळ्या विदर्भाचं स्वप्न कधीच पूर्ण होऊन देणार नाही, असा इशारा नितेश यांनी यावेळी दिला आहे.

Nitesh rane cake cutting

काही दिवसांपूर्वी अणेंनी महाराष्ट्राचे तुकडे करतानाचा प्रातिनिधिक स्वरूपातला केक कापला होता. अणे महाराष्ट्राचा केक कापून खुश होत असतील तर आम्ही पण अखंड महाराष्ट्रासाठी काहीपण कापण्यासाठी तयार आहोत, असं नितेश राणेंनी सांगितलं होतं.

मुंबई इथल्या गढी पाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी स्वतंत्र विदर्भाला विरोध करताना महाराष्ट्र म्हणजे केक वाटला काय? की ज्याचे हवे तितके तुकडे करावे? असा सवाल करीत महाराष्ट्राचे चार तुकडे करा, अशी मागणी करणार्‍या ज्येष्ठ विचारवंत मा.गो वैद्य यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरे यांच्या या टीकेला ऍड. अणे यांनी केक कापूनच प्रत्युत्तर दिलं होतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा