जात पंचायतींचा कहर सुरूच, आंतरजातीय विवाहामुळे कुटुंबावर बहिष्कार

April 18, 2016 8:25 PM0 commentsViews:

वैभव सोनवणे , पुणे – 18 एप्रिल : राज्यामध्ये जात पंचायतींचे अत्याचार रोखण्यासाठी सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा करण्यात आला आहे. पण कायदा धाब्यावर बसवून जात पंचायतीचा कहर सुरूच आहे. पुण्यात श्रीगौड ब्राम्हण जात पंचायतीमध्ये हा प्रकार आढळून आला आहे. आंतरजातीय विवाह केल्यामुळे शंकर डांगी या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आलं आहे. एवढंच नाही नातेवाईंकाच्या अंतविधीला उपस्थित राहायचं असले तर एक लाखांचा दंड ठोठवण्यात आला आहे.

¸üÖêÌæäÖ¦üÖêêËÛúÖê

पुण्यातल्या शंकर डांगी कुटुंबांवर जात पंचायतीनं जाच केला आहे शंकर डांगी यांच्या मुलानं आंतरजातीय विवाह केला आणि पंचायतीतनं त्यांना जातीबाहेर काढलं. इतकंच नाहीतर त्यांच्या काकांच्या अंत्यविधीला आल्यास तुमची गाढवावरून धिंड काढू असा धमकी ही दिलीय. जर पुन्हा जातीत यायचं असेल तर एक लाख रूपये दंड भरण्याचंही जात पंचायतीनं फर्मान सोडलं.

जात पंचायतीच्या जाचाला कंटाळलेल्या शंकर डांगींनी पोलिसांतही धाव घेतली. पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. उलट सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यानुसार कारवाई करण्याचा अध्यादेश अजूनही आमच्याकडे पोहचला नाही असं उत्तर त्यांना देण्यात आलं.

सामाजिक बहिष्काराविरोधात कायदा विधानसभेत पारित होऊनही , त्याचा अध्यादेश पोहचलेला नाही. सुट्टयांमुळे राज्यपालांची सही अध्यादेश न झाल्याचं पोलिस कारण पुढे करतायेत..पण याची अमलबजावणी झाली नाहीतर हा जात पंचायतीचा जाच असाच सुरू राहील.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा