‘चौथ्या गोळीवर स्वत:चे नाव लिहू नका’,डॉ. सुभाष देसाई यांना धमकीचे पत्र

April 19, 2016 9:23 AM0 commentsViews:

Subhash desai

कोल्हापुर – 19 एप्रिल :  कोल्हापुरातील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक डॉ. सुभाष देसाई यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सनातन परंपरेला आणि पुरोहितांना विरोध करू नका, अशी धमकी पत्रात देण्यात आली आहे. आमच्या तीन गोळ्यांनी अचूक वेध घेतलाय. चौथ्या गोळीवर स्वतःचं नाव लिहून घेण्याचाअट्टाहास सोडा अशी धमकी देण्यात आली आहे.

तसंच भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या तृप्ती ‘देसाई’ थोडक्यात बचावल्या, असा उल्लेखही या पत्रात करण्यात आला आहे.

दरम्यान, या पत्रामुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. डॉ. देसाई यांनी याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

डॉ. सुभाष देसाई यांना आलेल्या धमकीच्या पत्रात काय म्हटलंय?

महालक्ष्मी ही महालक्ष्मी नसून अंबाबाई आहे, शिवाय ती शिवपत्नी आहे, विष्णूपत्नी नाही असं जे तुमचे म्हणणं आहे ते तुमच्या पुरतेच ठेवा. या तुम्ही प्रबोधन वैगरे म्हणत असाल पण असले प्रबोधन करणा-यांचा शेवट कोल्हापूरात कसा झाला आहे ते सांगायला नको साळोखे नगरातील घरी तुम्ही एकटेच असता त्यामुळे आम्हाला तुमची काळजी वाटते.ऑफीसमध्येही जरा सांभाळून राहत जा कारण आजूबाजूचे लोकंही मदत करतील असे वाटत नाही सनातन धर्माला,सनातन परंपरेला आणि पुरोहितांना विरोध करू नका.आमच्या तीन गोळ्यांनी अचूक वेध घेतलाय.चौथ्या गोळीवर स्वत:चे नाव लिहून घेण्याचा अट्टाहास सोडा…नशिबाने एक देसाई वाचली दुस-या देसाईचे नशिब साथ देईलच असे नाही.

—– एक हितचिंतक


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा