आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी प्रत्युषाने केला होता गर्भपात!

April 19, 2016 10:14 AM0 commentsViews:

pratyusha-banerjee (6)

मुंबई –19  एप्रिल : प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी गर्भपात केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. जे.जे. रूग्णालयातील डॉक्टरांच्या अहवालानुसार प्रत्युषा गर्भवती होती आणि तिने आत्महत्येच्या काही दिवस अगोदरच स्वत:चा गर्भपात करवून घेतला होता.

आत्महत्या करण्याच्या दोन महिने अगोदर प्रत्युषा बॅनर्जी गर्भवती होती. तसंच तिचा गर्भपातदेखील करण्यात आला होता. मात्र सध्या कोणताच पुरावा हाती नसल्याने डीएनए चाचणी करुन मुलाचे वडील कोण आहेत सिद्ध करणं आव्हानात्मक असेल. प्रत्युषा बॅनर्जीने गर्भपात केला तेव्हा नेमके किती महिने झाले होते याची माहिती मात्र मिळू शकलेली नाही. ‘आम्ही कोणतीही माहिती उघड करु शकत नाही, आम्ही अहवाल पोलिसांच्या हवाली केला आहे, अशी माहिती जेजे रूग्णालयाचे डीन तात्याराव लहाने यांनी दिली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा