कोलकात्यात आग, 2 ठार

March 23, 2010 10:36 AM0 commentsViews: 4

23 मार्चकोलकात्यात्या पार्क स्ट्रीट भागात भीषण आग लागली आहे. प्रसिद्ध म्युझिक वर्ल्ड बिल्डिंगमध्ये ही आग लागली आहे. या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला असून आणखी 100 लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यांना वाचवण्याचे काम सुरू आहे. फायर ब्रिगेडच्या 15 गाड्या आणि 100 फायरमेन आग विझवण्याचे काम करत आहेत. ही इमारत अनेक मजली आहे. शिवाय पार्क स्ट्रीट भाग नेहमी गजबजलेला असतो. एका लिफ्टमध्ये लागलेली ही आग इमारतीत पसरली. सध्या हा भाग मोकळा करण्यात आला आहे.

close