राज ठाकरे आजपासून मराठवाड्याच्या 10 दिवसाच्या दौर्‍यावर

April 19, 2016 8:53 AM0 commentsViews:

raj_thackeray_20090629

19 एप्रिल :   राज्यात मराठवाड्यासह विदर्भ दुष्काळाने होरपळत आहे. मराठवाड्याला दुष्काळाची सर्वाधिक झळ बसली आहे. त्यासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे आजपासून दहा दिवसासाठी मराठवाड्याच्या दौर्‍यावर जात आहेत. आज संध्याकाळी ते या दुष्काळ दौर्‍यासाठी मुंबईहून रवाना होतील.

आजपासून 29 एप्रिलपर्यंत असा हा दहा दिवसांचा दौरा असून यात मराठवाड्यातल्या जास्तीत जास्त भागांना ते भेट देणार आहे. राज ठाकरे औरंगाबादसह जालना, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर भागाचा दौरा करणार आहेत. राज्य सरकारनं आणि मनसेनं केलेल्या मदतीच्या पाहणीसाठी राज ठाकरे या दौर्‍यावर जात असल्याचं सांगितलं जातं आहे. तसंच या दौर्‍यानंतर दुष्काळग्रस्तांना मदत काय मदत करायची याचा निर्णय मनसे घेईल असं पक्षाच्या नेत्यांनी म्हटलं आहे.

मनसेचा गुढीपाडवा मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यात राज यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली होती. राज आता मराठवाड्याच्या दौर्‍यावर जाणार असल्याने दुष्काळ आणि एकूनच सरकारबाबत काय भूमिका घेतात आणि मांडतात याकडे सर्वांचं लक्ष असेल.

असा असेल दुष्काळ दौरा

  • लातूरपासून दुष्काळ दौर्‍याला सुरुवात
  • लातूरनंतर बीड, परळी, जालना, भोकरदन
  • ते औरंगाबाद असा करणार दुष्काळ दौरा
  • दुष्काळ दौर्‍यात राज ठाकरे मराठवाड्यातील
  • जलसंधारणांच्या कामांचीही करणार पाहणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा