राज्यभरात तब्बल 4 हजार 356 टँकरने होतोय पाणी पुरवठा

April 19, 2016 2:50 PM0 commentsViews:

 

B_Id_387678_water_tank

19 एप्रिल :  पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून राज्यात सध्या 4 हजार 356 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.

त्याचबरोबर, राज्यभरात 200 फुटांपेक्षा खोल बोअर खोदण्यावर बंदी घातली जाणार असून त्याचा भंग करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचंही लोणीकर यांनी स्पष्ट केलं आहे. सततचा दुष्काळ, खोलवर जाणारा भूजलसाठा, त्यामुळे वारंवार निर्माण होणार्‍या पाणीटंचाईमुळे सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं लोणीकरांनी सांगितलं आहे.

राज्यात यावर्षी पहिल्यांदाच विक्रमी संख्येत टँकर्सने पाणी पुरवठा सुरू असल्याचं समोर आलं आहे. राज्या पुरवण्यात येणार्‍या 4 हजार 356 टँकर्सपैकी 3 हजार टँकर्स फक्त मराठवाड्याच्या वाटेला आहेत. यापूर्वी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅकर्सने पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना पाणीटंचाई अधिकाधिक वाढत आहे.

विभाग नुसार टँकर

ठाणे 52
नाशिक 831
पुणे 303
औरंगाबाद 3032
अमरावती 131
नागपूर 7

टँकर जिल्हानिहाय

औरंगाबाद 675
जालना 433
बीड 798
परभणी 192
हिंगोली 29
नांदेड 303
उस्मानाबाद 343
लातूर 259


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा