आता हॉटेल्समध्ये मागितलं तरच मिळणार पाणी, ते ही अर्धा ग्लासच!

April 19, 2016 3:05 PM0 commentsViews:

मुंबई –19  एप्रिल : राज्यातला दुष्काळ पाहाता आता मुंबईतल्या हॉटेल व्यावसायीकांनी पाणी बचतीचा निर्णय घेतला आहे. मुंबईतल्या हॉटेल व्यावसायीकांच्या सर्वात मोठ्या संघटनेने म्हणजे ‘आहार’ने हॉटेलमध्ये येणार्‍या ग्राहकांना मागितल्या शिवाय पाणी न देण्याचा आणि सुरुवातीला आर्धा ग्लासच पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतल्या कुठल्याही रेस्टोरेंटमध्ये बसल्यानंतर तुम्हाला आर्धा ग्लासचं पाणी दिलं गेलं तर आश्चर्य वाटून घेवू नका आणि त्यावरून हॉलेट मालकाशी वादही घालू नका. या व्यावसायीकांनी मानवतेच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकतं पाणी बचतीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ‘आहार’नं मुंबईतल्या आपल्या 8 हजार सदस्यांना हा मार्ग स्विकारण्यास सांगितलं आहे. मुळातच हॉटेल व्यावसायिकांच्या या व्यवसायाला पाणी खूप लागतं. येणार्‍या ग्राहकांपासून ते रस्त्यावरुन जाणार्‍या प्रत्येकाला उन्हाळ्यात पाणी हवं असतं. अशावेळी ही काटकसर खरतर खूप वेळा ग्राहकांना न पटणारी सुद्धा असते.

sdasdapy
मुंबईकरांची गरज ओळखून रस्त्यारस्त्यावर हॉटेल आणि रेस्टॉरंट आहेत. साहजिकच त्यांना पाणीही तितकेच लागणार. अशावेळी पाणी कपातीचं संकट आलं तर त्याचा फटका या व्यवसायालाही बसू शकतो. त्यामुळे कपातीपेक्षा काटकसर बरी असं हॉटेल मालकांना वाटतं वाहतुकीला लागणार्‍या वेळामुळे आर्धे मुंबईकर हे दिवसातलं एक जेवण किंवा नाष्टा हा हॉटेल किंवा रेस्टोरेंटमध्ये करतात. त्यामुळे रस्त्या रस्त्यावर रेस्टोरेंट आणि हॉटेल आहेत. साहाजिकच त्याला लागणारं पाणी सुद्धा तितकच जास्त आहे. त्यामुळे राज्यातल्या इतर व्यावसायांवर येणार्‍या पाणी कपाती प्रमाणे या व्यावसायावर सुद्धा टांगती तलवार आहे. त्यामुळे उद्या येणार्‍या कपातीपेक्षा आधीच काटकसर केली तर बरं होईल असं अनेक हॉटेल मालकांना वाटतं आहे.

2009 साली मुंबईत पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालं होतं. त्यावेळी या व्यायसायीकांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला होता. पण ग्राहकांकडून त्याला चांगला प्रतिसाद न मिळाल्याचा हॉटेल व्यावसायीकांचा अनुभव आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा