अब्दुल सत्तार यांच्यावर अजूनही गुन्हा नाही

March 23, 2010 10:41 AM0 commentsViews: 2

23 मार्चनरगसेवकाच्या समर्थकाला मारहाण करणारे काँग्रेसचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही. सोमवारी विधीमंडळातही त्याचे पडसाद उमटले. काँग्रेसच्या मंत्र्याने असे कृत्य केल्याने हायकमांडनेही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना अखेर त्यांची भूमिका बदलावी लागली. आणि हा मुद्दा महत्त्वाचा नाही, असे म्हणणार्‍या मुख्यमंत्र्यांना अखेर जे झाले ते चुकीचे होते, असे म्हणावे लागले. पण सत्तार यांच्यावर अजून कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.

close