पाणीटंचाईचे बळी, विहिरीत पडून दाम्पत्याचा मृत्यू

April 19, 2016 4:43 PM0 commentsViews:

यवतमाळ : 19 एप्रिल : पाणीटंचाईनं यवतमाळमध्ये एका दाम्पत्याचा जीव घेतलाय. यवतमाळच्या वडगाव तांडा इथं एका नवराबायकोचा विहिरीत पडून मृत्यू झाल्यानं त्यांची तीन मुलं पोरकी झाल्याची दुदैर्वी घटना घडलीये.

yavatmal3433दिग्रस तालुक्यात वडगाव तांड्यावरच्या नागरिकांना सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. गावात पाणी पुरवठ्यासाठी दोनच विहिरी आणि तीन कूपनलिका आहे. गावातील हे जलस्रोत महिनाभर्‍यापूर्वी आटले. त्यामुळे प्रशासनाने गावालगतच्या जगदीश राठोड यांच्या शेतातील विहीर पाणी पुरवठ्यासाठी अधिग्रहित केली.

काल रात्री दरम्यान घरात पाणी नसल्याने माणिक जाधव आणि मेनका जाधव हे दोघे पती पत्नी राठोड यांच्या शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेले होते. या वेळी मेनका जाधव हिने विहिरीत बादली टाकल्यावर पाणी येत नसल्याने वाकून विहिरीतून पाणी काढण्याचा प्रयत्न केला यात तिचा तोल गेल्याने ती विहिरीत पडली. तिच्या बाजूलाच उभा असलेले त्यांचे पती माणिक यांनीही तिला वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतली. पण यात त्याच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे दोघांचाही या घटनेत मृत्यू झाला.

पाणी भरण्यासाठी गेलेली मेनका आणि तिचा पती माणिक हा बर्याच वेळपर्यंत परत आले नाही. त्यामुळे गावात शोधाशोध सुरू झाली. तेव्हा विहिरीवर बादली आणि गुंड दिसून आला. तेव्हा विहिरीत शोधले असता दोघाही मृत अवस्थेत आढळून आले. या घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने आता तरी वडगाव तांडा पाणी टंचाई मुक्त करावं एवढीचं अपेक्षा गावकर्‍यांची आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा