आधी विनंती नाहीतर थप्पड, बच्चू कडूंचा अधिकार्‍यांना थेट इशारा

April 19, 2016 5:09 PM0 commentsViews:

अमरावती – 19 एप्रिल : कायदे बनवणं हे आमदरांच्या अनेक कामांपैकी एक…पण आमदाराच लोकांना कायदा तोडायला सांगत असतील तर?.. अमरावतीचे आमदार बच्चू कडू यांनी आपल्या जनता दरबारात असाच एक वादग्रस्त सल्ला जनतेला दिलाय. जनतेची कामं केली नाहीत, तर आम्ही थप्पड मारो आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला. कामांसाठी आधी विनंती करणार, त्यानंतरही कामं होत नसतील तर थप्पड मारो आंदोलन पुकारणार, असं सांगत कडू यांनी अधिकार्‍यांना थेट इशारा दिलाय.

bacchu_kadu33मंत्रालयात उपसचिवाला मारहाण केल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी ठिकठिकाणी जनता दरबार भरवायला सुरुवात केली. अमरावती विश्रामगृहात बच्चू कडू यांनी आज (मंगळवारी) जनता दरबार भरवला. महत्वाचं म्हणजे या दरबाराला भरभरुन प्रतिसाद मिळाला. त्यांचा दरबार सुरू असतांना विश्रामगृहात तीन मंत्री मुक्कामी होते. मात्र, तक्रारकर्त्यांची गर्दी कडू यांच्याकडे जास्त होती. जनतेची काम न केल्यास अधिकार्‍यांना थप्पड मारो आंदोलन करण्याचं वादग्रस्त इशारा बच्चू कडू यांनी यावेळी दिला. या दरबारात बच्चू कडू यांच्याकडे 250च्या वर जनतेच्या तक्रारी आल्यात, त्यापैकी काही तक्रारी सोमवारीच निकाली लागल्यात. यातील बहुतांश कामं केवळ लाच देत नसल्यामुळे आणि वशीला नसल्याने रखडल्यास स्पष्ट झालंय. त्यामुळे यानंतर जनतेच्या कामांसाठी आधी अधिकार्‍यांना विनंती करणार ,त्यानंतरही काम न झाल्यास, तर थप्पड मारो आंदोलन पुकारणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

तसंच 5-5 ,10 वर्षांपासून नागरिक, शेतकरी सरकारी कार्यालयात चकरा मारतात मात्र शासकीय कर्मचारी -अधिकारी जनतेचे काम करत नसल्याचे उघड झाले. 5 भूमिहीन आणि 5 माजी सैनिकांनी शेती मिळावी म्हणून अर्ज केला. शासन दरबारी शेती देण्याचा निर्णय घेण्यात येऊनही केवळ बाबूगिरीमुळे त्यांना शेती मिळाली नाही. त्यातील 6 जणांचा मृत्यूही झाला. शासकीय कार्यालयात पैश्या आणि वाशिलेबाजीशिवाय कामेच होत नाही अशा लोकांची कामे व्हावी म्हणून आपण हा दरबार घेतला असं कडू यांनी सांगितलं. एवढंच नव्हे तर आधी कर्मचारी अधिकारी यांना विनंती करण्यात येईल पण तरीही जनतेची काम केले नाही तर मात्र थप्पड मारो आंदोलन जिल्ह्यात आणि राज्यभर करणार असंही कडू यांनी स्पष्ट केलं.

कडू यांच्या दरबारात अनेक शेतकर्‍यांनी आपल्या तक्रारी नोंदवल्यात. भूमी अभिलेख ,तलाठी,महसूल विभागात शेतीच्या मोजणीच्या अनेक तक्रारी शेतकरी घेऊन आले होते. शासन दरबारी अनेकद चकरा मारून काहीच न्याय मिळत नसल्याने शेवटी बचू कडू यांच्याकडे आलो असल्याचं शेतकर्‍यांचं म्हणणं आहे. बच्चू कडू यापुढील जनता दरबार हा मुंबईत 21 एप्रिलला घेणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा