लग्नास नकार दिला म्हणून प्रियकराने केली प्रेयसीच्या आई-वडिलांची हत्या

April 19, 2016 5:25 PM0 commentsViews:

वर्धा – 19 एप्रिल : राग ही भावना स्वतःचा आणि इतरांचा किती घात करू शकते, याचं एक उदाहारण वर्धा जिल्ह्यात घडलं.. लग्नाला नकार देणार्‍या प्रेयसीच्या आई वडिलांची झोपेतच प्रियकराने हत्या केली. यात प्रेयसी आणि आजी जखमी झाल्या असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय कारंजा येथे उपचार सुरू आहेत.crime scene

रेखा भांडेकर आणि पांडुरंग भांडेकर या पती पत्नीसह मुलगी तसंच आजी झोपेलेले असताना कोंढाळी येथील पंकज टिकोनवार या जावयाच्या लहान भावाने पहाटे घरात घुसून हल्ला केला.  यात रेखा भांडेकर यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना  मृत्यू झाला. तर पांडूरंग भांडेकर यांना नागपूरला नेत असताना त्यांचे प्राण गेले.

आपल्या मुलीचा हात मागितल्यावर या दाम्पत्यानं नाही म्हटल्यावर या पंकजला राग अनावर झाला, आणि त्यानं हे कृत्य केलं. जखमी प्रेयसी आणि आजीवरही उपचार सुरू आहेत. आरोपी पंकज टिकोनवार हा जावयाचा लहान भाऊ असून त्याला कारंजा पोलिसांनी अटक केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा