नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, तीनही नराधम अटकेत

April 19, 2016 5:35 PM0 commentsViews:

nagar rapeनागपूर – 19 एप्रिल : नागपुरच्या हिंगणा परिसरात एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणाचा काही तासांतच छडा लावत या प्रकरणातील तीनही आरोपी मोहन वर्मा, राकेश पटले आणि आकाश दुपारे यांना अटक केली आहे.

सोमवारी रात्री मोहन वर्मानं या मुलीला फोन करून हिंगणा भागात बोलावून तिला आपल्या दोन साथीदारांसोबत जबरदस्तीने कारमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केले.

या घटनेतील पीडित मुलगी या तीन आरोपींपैकी राकेश वर्मा याला मोहन वर्मा याला ओळखत होती. या मुलीला या तरुणांनी गुंगीचे इंजेक्शनही दिल्याचंही पोलीस तपासात उघड झालं आहे. यासदंर्भात नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा