महिलेला विवस्त्र करून मारहाण

March 23, 2010 10:47 AM0 commentsViews: 58

23 मार्चरस्ता रुंदीकरणाला जागा नाकारली म्हणून वृध्द विधवा महिलेला सरपंच आणि गावकर्‍यांनी विवस्त्र करून जबर मारहाण केल्याची घटना रत्नागिरीत घडली आहे. तुळसणी गावातील या प्रकरानंतर या महिलेला वाळीतही टाकण्यात आले आहे. 60 ते 70 लोकांनी या महिलेला मारहाण केली. पण पोलिसांनी फक्त 6 जणांवर किरकोळ गुन्हे दाखल करून त्यांना सोडून दिले. हल्ल्याचे सूत्रधार असलेले सरपंच सुनील बेर्डे आणि महिला मंडळाची अध्यक्षा वहिदा मुकादम हे राजकीय दबावापोटी मोकाटच असल्याचे गावकर्‍यांचे म्हणणे आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारीही या प्रकरणात काहीही बोलायला तयार नाहीत. गावातील तंटामुक्त समितीनेही सरपंचाच्या सांगण्यावरून बेर्डे कुटुंबीयांच्या अर्जाची दखल अजून घेतलेली नाही. या प्रकरणाची मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.

close