बीडमध्ये उष्माघाताने 11 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

April 20, 2016 9:30 AM0 commentsViews:

Beed Death

बीड – 20 एप्रिल : मराठवाड्यात पाण्याची प्रंचड टंचाई असून त्यामुळे आणखी एक बळी गेला आहे. दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातील साबळखेड गावात पाण्यासाठी हातपंपावर सतत फेर्‍या मारल्यामुळे 12 वर्षाच्या मुलीचा उष्माघाताने मृत्यू झाला. शाळेला सुट्टी असल्यामुळे पाणी वाहून आणण्यासाठी घरच्यांना योगिता देसाई ही शाळकरी मुलगी मदत करत होती. घराजवळच्या हातपंपावरून पाण्यासाठी तिने अनेक फेर्‍या मारल्या होत्या.

बीड जिल्ह्याला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तिथल्या लोकांना पाण्यासाठी दाहीदिशा फिरावं लागत आहे. या गावातील पाचवीत शिकणारी योगिता पाणी आणण्यासाठी घरच्यांना मदत करत होती. भर उन्हात ती घराजवळच असलेल्या हातपंपावरून पाणी वाहून नेत होती. पाण्यासाठी वारंवार फेर्‍या मारल्याने ती चक्कर येऊन पडली. बेशुद्ध झालेल्या या मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. मात्र खाजगी रुग्णालयात मृत्यू झाल्याने शासकीय पातळीवर याची कुठे हि नोंद नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा