दुष्काळ दौर्‍यासाठी राज ठाकरे लातूरमध्ये दाखल

April 20, 2016 10:04 AM0 commentsViews:

लातूर – 20 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दहा दिवसांच्या दुष्काळ दौर्‍यासाठी लातूरला पोहोचले आहेत. आज सकाळी ट्रेनने राज ठाकरेंचं लातूरमध्ये आगमन झालं. तब्बल दोन वर्षांनंतर राज ठाकरे दुष्काळ दौरा करत आहेत.

sdasdopy

लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांचा राज ठाकरे दौरा करणार आहेत. आज ते लातूर शहरात दुष्काळग्रस्तांना आवश्यक गोष्टींचं वाटप करणार आहेत. त्यानंतर ते जामखेडला जातील आणि तिथल्या 5 ते 6 गावांना भेट देतील. संध्याकाळी ते तुळजापूरला जातील, त्यांचा आज रात्री तिथेच मुक्काम असेल. राज ठाकरेंसोबत मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि इतर नेतेही आहेत.

दुष्काळ दौर्‍यावर निघताना राज ठाकरेंनी आघाडीसह विद्यमान राज्य सरकारवरही टीका केली. राज ठाकरे म्हणाले, दुष्काळ हे मानवनिर्मीत संकट असून काँग्रेस राष्ट्रवादीने सिंचनाचे उपाय केले नाहीत. ज्याप्रकारे पाणी अडवलं पाहिजे होतं, तसं अडवलं नाही. आघाडीच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम म्हणजे आजचा दुष्काळ आहे. किंबहुना म्हणूनच आघाडी सरकारला जनतेनं बाजूला सारलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा