मेपल ग्रुपने मंत्र्यांचे फोटो न विचारताच वापरले

April 20, 2016 4:12 PM0 commentsViews:

पुणे – 20 एप्रिल : पुण्यात कुठेही 5 लाखात घरं देण्याचं स्वप्न दाखवणार्‍या मेपल ग्रुपच्या चौकशीचा अहवाल पुणे जिल्हाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आलाय. घरांच्या जाहिरातींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे कोणत्याही परवानगी न घेता हे फोटो वापरले असल्याचं समोर आलंय.

mepal_puneघरं देण्यासाठी अग्रवाल बिल्डरकडे प्रकल्पासाठी मुबलक जमीन आहे पण म्हणून स्वस्त किमतीत घरं देता येणार का ? याची चाचपणी करण्यात येणार आहे. सर्व जमिनींचा एनए झालाय, कमी किंमतीत घर देता येणार का ? याबाबतच कंपनीची स्कीम काय याचादेखील अहवाल यात आहे. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे फोटो न विचाराता लावले असल्याचं अहवालात स्पष्ट झालंय. म्हाडाची दक्षता समिती पुण्यात गेली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.

गिरीष बापट आणि गणेश बीडकर अडचणीत

पुण्यातील मॅपल ग्रुपचे सचिन अग्रवाल यांच्याशी जवळकीच्या आरोपावरुन पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट अडचणीत आले. त्या पाठोपाठ पुणे महापालिकेचे माजी गटनेते गणेश बीडकर यांचे सचिन अग्रवाल यांचे सहकारी नवीन अग्रवाल यांच्याशी अन्य एका प्रकल्पात व्यावसायिक भागीदारी असल्याची माहिती बीडकरांनी दिलीये. मात्र, सध्या वाद सुरू असलेल्या स्वस्त घर योजनेशी आपला काहीही संबंध नाही असा खुलासा बीडकर यांनी केलाय.

दरम्यान, मनसेच्या कार्यकर्त्यांनी गिरीश बापट यांच्या पुण्यातील घराबाहेर ‘गिरीश बापट हायहाय’ अशा घोषणा देत आंदोलन केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा