बेळगावमध्ये भीषण अपघातानंतर जमावाने जीप जाळली

October 12, 2008 1:51 PM0 commentsViews: 14

12 ऑक्टोबर, बेळगावबेळगाव – गोवा हायवेवर तिरणवाडी गावाजवळ जीपच्या अपघातात दोन मुली जागीच ठार झाल्या. या अपघातानंतर चिडलेल्या गावकर्‍यांनी जीप जाळली. पोलिसांनी जीपचालका विरोधात गुन्हा दाखल केला असून गावकर्‍यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. नजिमा बडेकर आणि दीपा दोडमनी या दोघी रस्त्यानं चालत जात होत्या. त्यावेळी पाठीमागून गोव्याहून येणार्‍या जीपनं त्यांना धडक दिली. यात त्या दोघी जागीच ठार झाल्या. त्यानंतर जमावानं जीप जाळली. जीपचा ड्रायव्हर फरार झाला आहे. त्याच्याविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन गावकर्‍यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

close