मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बोगस डॉक्टर मुनीर खानचा सत्कार

April 20, 2016 4:33 PM0 commentsViews:

मुंबई – 20 एप्रिल : एकीकडे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होतोय. त्याचवेळी दुसरीकडे गृह खात्याचाही कारभार सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनपेक्षितपणे वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. बोगस डॉक्टर मुनीर खानला पुरस्कार दिल्यामुळे हा वाद निर्माण झालाय.cm_munir_khan3

अनेक आजारांवर औषधं तयार केल्याचा मुनीर खानचा दावा आहे, मात्र त्याचा हा फसवेपणा यापूर्वीच उघड झाला होता. एका खासगी वृत्तवाहिनीने 13 एप्रिलला गेट वे ऑफ इंडियाला एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुनीर खानचा सत्कार करण्यात आला होता. बोगस डॅाक्टरचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार केल्याबद्दल वैद्यकीय क्षेत्रामध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मात्र, या कार्यक्रमातल्या पुरस्कारांशींची माहिती शेवटच्या क्षणी मिळाली. आणि हा शासकीय कार्यक्रम नसल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा