शिकारीसाठी विषप्रयोग जनावरांचा जीवावर बेतलं, 19 गायीसह 4 बैलांचा मृत्यू

April 20, 2016 6:45 PM0 commentsViews:

वाशिम – 20 एप्रिल : मंगरुळपीर तालुक्यातल्या साळंबी गावात अज्ञाताने शिकारीसाठी केलेल्या विषप्रयोगाने 19 गायी आणि 4 बैलांचा मृत्यू झालाय. अजून 25 गायींना विष बाधा झालीय. त्या गायींची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनं संपूर्ण गावावर शोककळा पसरलीय.washim3

साळंबी गावाशेजारल्या जंगलात जंगली जनावरांच्या शिकारीसाठी विषप्रयोग करण्यात आला होता. मात्र ते विष गावातल्या जनावरांच्या जीवावर बेतलंय. सकाळी जंगलात चरायला गेलेले गाई-बैल संध्याकाळी गावात आल्यावर मरून पडले. इतक्या मोठ्या संख्येनं जनावरांना झालेली विषबाधा बघून शेतकर्‍यांना मोठा धक्का बसलाय. तर संपूर्ण गावात भीतीचं वातावरण आहे. बैलांचाही मृत्यू झाल्यामुळे शेतकर्‍यांना बैलांविनाच शेतीची कामं करावी लागणार आहे. आधीच दुष्काळ शेतकर्‍यांच्या जीवावर उठलाय. त्यात हे संकट ओढवल्यानं शेतकरी कोलमडून गेलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा