शिर्डीत रामनवमी उत्सव

March 23, 2010 11:15 AM0 commentsViews: 12

23 मार्च शिर्डीत तीन दिवस चालणार्‍या रामनवमी उत्सवास आजपासून सुरुवात झाली आहे. लाखो साई भक्त पालख्यांसह पायी चालत शिर्डीत दाखल झालेत. या उत्सवासाठी सर्व जातीधर्माचे लोक शिर्डीत एकत्र आले आहेत. या वर्षी या उत्सवास 99 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे शिर्डी संस्थानानेही या उत्सवाची जय्यत तयारी केली आहे.काळाराम मंदिरात बंदोबस्तनाशिकचे काळाराम मंदिर सुरक्षा यंत्रणेसह रामजन्मासाठी सज्ज झाले आहे.काळाराम मंदिर नाशिक शहरातील संवेनशील समजल्या जाणार्‍या हॉटलिस्टमधील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पहिल्यांदाच खास सीसीटीव्हीच्या नजरेत यंदाचा रामजन्मोत्सव सोहळा होणार आहे. यासाठी 8 सीसी टीव्ही बसवण्यात आले आहेत. मंदिरात शिरण्याच्या आणि बाहेर पडण्याच्या मार्गावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. सध्या मंदिरात काठीधारी सुरक्षा रक्षक आहेत. मात्र ते शस्त्रधारी असावेत, हा निकष एटीएसतर्फे ठरवण्यात आला आहे.

close