सलमानचा असाही मोठेपणा,चिमुरडीला दिली ‘सुलतान’मध्ये एंट्री

April 20, 2016 7:58 PM0 commentsViews:

दबंग खान अर्थात सलमान खान याचे अनेक फॅन्स आहे. सलमानही आपल्या चाहत्यांसाठी काय काय करू शकेल याचा नेम नाही. त्याने एका चिमुरड्या फॅनला थेट ‘सुलतान’मध्ये रोल दिलाय.

त्याचं झालं असं की, सलमान खानचा बजरंगी भाईजान या सिनेमामध्ये सलमानला एका सीनमध्ये मारतांना बघितल्यानंतर एक चिमुकली फॅन जोरजोरात रडायला लागली. हे समजताच सलमान तिला भेटायला गेला. एवढंच नाही तर चक्क सलमानने तिला आपल्या सुलतान सिनेमामध्ये रोल दिलाय. सुलतानमध्ये ती चिमुकली सलमानच्या मुलीचा रोल करणार आहे. पहिले असं ऐकण्यात आल होत की, ती अनुष्का शर्माच्या लहानपणीची भुमिका करणार आहे. ही चिमुरडी फॅन आहे सुजी खान…आपल्यावर असलेल्या प्रेमासाठी त्याने या चिमुकलीला आपल्या सुलतान सिनेमामध्ये त्याच्यासोबत काम करण्याची संधी दिलीये. यातूनच सलमानचा आपल्या फॅनसाठी असलेलं प्रेम आणि मोठेपणा दिसून येतोय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा