बंगलोर रॉयल चॅलेंजर्सचा मुकाबला चेन्नईशी

March 23, 2010 11:21 AM0 commentsViews: 2

23 मार्चआयपीएलमध्ये आज एकच मॅच रंगणार आहे. बंगलोर रॉयल चॅलेंजर्सचा मुकाबला असणार आहे तो चेन्नई सुपर किंग्जशी.बंगलोरने किंग्ज इलेव्हनचा 8 विकेट राखून, राजस्थान रॉयल्सचा 10 विकेट राखून तर मुंबई इंडियन्सचा 7 विकेट राखून पराभव केला. तुफान फॉर्मात असलेल्या जॅक कॅलिसने या प्रत्येक मॅचमध्ये नॉटआऊट हाफसेंच्युरी करत टीमच्या विजयात मोठा वाटा उचलला आहे. त्यामुळे जॅक कॅलिस चेन्नईला सर्वात मोठा अडथळा ठरणार आहे. याऊलट चेन्नई सुपर किंग्जला चार मॅचपैकी दोन मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. किंग्ज इलेव्हनविरुध्दची जिंकत आलेली मॅच चेन्नईला सुपर ओव्हरमध्ये गमवावी लागली होती. त्यामुळे चेन्नईपेक्षा या मॅचमध्ये बंगलोरचे पारडे जड आहे.

close