द्रौपदी नव्या रुपात

March 23, 2010 11:29 AM0 commentsViews: 4

23 मार्चमहाभारतातील द्रौपदीचे आकर्षण अनेक कलाकारांना आहे. द्रौपदीवर अनेक नाटके, सिनेमे निघाले. नुकतेच राजधानी दिल्लीत द्रौपदीवर एक नाटक सादर झाले. पण ते नेहमीपेक्षा वेगळे होते.कारण हे नाटक आहे आजच्या स्त्रीवर…यात निर्माती आणि अभिनेत्री शिवानी वझिरने द्रौपदीची भूमिका साकारली आहे. ही द्रौपदी समाजातील पीडित महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करते. शिवानीसाठी ही भूमिका म्हणजे द्रौपदीकडे नव्या नजरेने पाहण्यासारखे आहे. नाटकाच्या सुरुवातीला द्रौपदी एकदम आनंदी स्त्री आहे. ती गाणेही गाते. आणि नंतर ती एक स्ट्राँग, अन्यायाचा प्रतिकार करणारी स्त्री बनते.एन्जोली एला मेननने या नाटकाचे नेपथ्य केले आहे. तर कॉस्च्युम केला आहे, रितू कुमारने. या शोद्वारे ब्रेस्ट कॅन्सर पेशन्टना मदत केली जाणार आहे.

close