‘आर्थर रोड जेलमध्ये अधीक्षक पैसे घेऊन कैद्यांना पुरवता सोयीसुविधा’

April 20, 2016 10:55 PM0 commentsViews:

20 एप्रिल : मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये तुरुंग अधीक्षक बड्या कैद्यांकडून पैसे उकळतात आणि त्यांना हवी ती सुविधा पुरवतात असा गंभीर आरोप डॉ. घुले यांनी केलाय. रमेश कदम, समीर भुजबळ आणि पीटर मुखर्जी यांना अधीक्षक सुखसोयी देतात असा दावाही घुले यांनी केलाय. डॉ. घुले हे आर्थर रोड जेलमध्ये डॉक्टर आहे. त्यांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.

arthur_road_jailआर्थर रोड जेलमधील डॉ. राहुल घुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. या पत्रात तुरुंग अधीक्षक भारत भोसले बड्या कैद्यांकडून पैसे उकळतात. भोसले हे अण्णाभाऊ साठे महामंडळ गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी रमेश कदम यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना सुखसोयी देतात असा दावा डॉ. घुलेंनी केलाय. तसंच ऑर्थर रोड जेलमध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी समीर भुजबळ आणि शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील दोषी पीटर मुखर्जी यांच्याकडूनही पैसे घेऊन सुविधा दिल्या जातात. कैद्यांवर दबाव न टाकल्यास अधिक्षक धमकीही देतात असंही घुले यांनी सांगितलं. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणीही घुले यांनी केली. तसंच जेलच्या कारभाराचे वाभाडे निघावे अशी माझी इच्छा नाही. मात्र गैरव्यवहार थांबावा अशी इच्छा आहे. एखाद्यावेळे तक्रार केल्यामुळे माझ्या विरूद्ध सुडबुध्दीनं कारवाई होईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा