नारीशक्तीचा विजय, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभार्‍यात अखेर महिलांचा प्रवेश

April 21, 2016 10:10 AM0 commentsViews:

trimbakeshwar Darshan new

20 एप्रिल : मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शनी चौथरा महिलांसाठी खुला करून दिल्यानंतर आज (गुरूवारी) त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळाला आहे.स्वराज्य संघटनेच्या प्रमुख विनीता गुट्टेंसह काही महिलांनी गुरूवारी सकाळी त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात प्रवेश केला. आज सकाळी पावणेसहाच्या सुमारास कडेकोट बंदोबस्तात या महिलांनी गर्भगृहात प्रवेश करून त्र्यंबकेश्वराला अभिषेक घातला.

गेल्या काही दिवसांपासून महिलांना गर्भगृहात प्रवेश देण्यास मंदिर प्रशासन आणि ग्रामस्थ विरोध करत होते. याच कारणावरून स्वराज्य महिला संघटना आणि मंदिर प्रशासनासह स्थानिकांमध्ये ताल (बुधवारी) मारहाणही झाली होती. या प्रकरणी 150 ग्रामस्थांवर मारहाणीचा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. माजी नगराध्यक्ष अनघा फडके यांच्या वरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखेर आज कडेकोट पोलीस बंदोबस्तात महिलांनी गर्भगृहात प्रवेश केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा