मारुती विक्रमाच्या वळणावर

March 23, 2010 11:38 AM0 commentsViews: 3

23 मार्चमारुती कंपनी आज एक वेगळाच टप्पा गाठणार आहे. एकाच वर्षामध्ये 10 लाख गाड्यांचे उत्पादन करण्याचा विक्रम आज कंपनी करणार आहे. कंपनीची ही 10 लाखावी गाडी असणार आहे. कंपनीच्या मानेसर प्लँटमधून या गाडीचे उत्पादन होणार आहे.टोयोटा, जनरल मोटर्स, फोर्ड, होंडा आणि ह्युंदई या कंपन्या सध्या वर्षाला 10 लाख गाड्यांचे उत्पादन करतात. 1983 मध्ये सुरु झालेली मारुती कंपनी आज हा टप्पा गाठत आहे. सध्या या कंपनीकडे भारतीय कार मार्केटचा 54 टक्के हिस्सा आहे.

close