राज ठाकरेंपाठोपाठ सुप्रिया सुळेही मराठवाड्याच्या दुष्काळ दौर्‍यावर

April 21, 2016 12:11 PM0 commentsViews:

Cgi3D84WsAAyQHu

21  एप्रिल : राज ठाकरेंपाठोपाठ सुप्रिया सुळेही मराठवाड्याच्या दुष्काळदौर्‍यावर निघाल्या आहेत. औरंगाबादमधून त्यांनी आपल्या दौर्‍याला प्रारंभ केला. त्यांच्यासोबत धनंजय मुंडे यांच्यासह सर्व पदाधिकारी देखील दौर्‍यात सहभागी आहेत. औरंगाबाद, जालना बीड, उस्मानाबाद, लातूर या जिल्हयांमध्ये जावून त्या शेतकर्यांशी संवाद साधतायत.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. आमचं सरकार असताना शेतकरी आत्महत्या व्हायच्या तेव्हा आताचे मुख्यमंत्री 302 कलम लावण्याची मागणी करायचे. आता तुमच्या सरकारातही आत्महत्या होत आहेत. तर 302चा न्याय आम्ही मागतोय, असं म्हणत सुप्रिया यांनी मुख्यमंत्र्यांवप टीका केली.

तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या दुष्काळी दौर्‍याचा आज (गुरूवारी) दुसरा दिवस सुरू आहे. राज ठाकरे काल (बुधवारी) रात्री सोलापूरात मुक्कामी होते. आज सकाळी 9 वाजता ते दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले. सकाळी 10 वाजता त्यांनी सोलापूरातील मडकी वस्ती इथल्या विंधन विहीर आणि पाईप लाईन कामाचा शुभारंभ केला. त्यानंतर ते परांडा येथील न्यायालयात हजर झाले. दरम्यान कोर्टातल्या सुनावणीनंतर राज परांड्यातल्या गावांना ते भेटी देणार आहेत. तर आज त्यांचा मुक्काम उस्मानाबादमध्ये असणार आहे.

3


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा