मुंबईत 1 मे पासून रिक्षाभाडे वाढण्याची शक्यता

March 23, 2010 12:27 PM0 commentsViews: 1

23 मार्चमुंबईत रिक्षाभाडे वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या एक मेपासून राज्यभरात रिक्षासाठी समान भाडे आकारण्यात यावे, असा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. तशी माहिती परिवहनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. एक मेपासून प्रस्तावाची अमलबजावणी करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यानुसार सीएनजीवर चालणार्‍या रिक्षांसाठी पहिल्या 1.6 किलोमीटर अंतराला 10 रुपये आणि नंतर पाच रुपये आकारले जाऊ शकतात. मुंबईत सध्या 1.6 किलोमीटर अंतरासाठी 9 रुपयेच आकारले जातात. त्यामुळे मुंबईकरांना रिक्षेसाठी एक रुपया द्यावा लागणार आहे.

close